बीड : बीड परळी राष्ट्रीय मार्गावर बकरवाडी फाट्याजवळ काल रात्री 9 च्या सुमारास रिक्षा आणि कंटेनरच्या धडकेत एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. Accident
---Advertisement---
या अपघातात रिक्षामधील एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून प्रवाशांना घेऊन रिक्षा बीडकडे येत होती. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.
आई नसरीन अजीम शेख (वय वर्षे 35), नोमान अजीम शेख (वय वर्षे 13) आणि अदनान अजीम शेख (वय वर्षे 12) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक अजीम शेख हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. हे सर्वजण बीड शहरातील राहिवाशी आहेत.
---Advertisement---