Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

Mahavikas Aghadi : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी येत आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीची शनिवारी पत्रकार परिषद पार पडली. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांंसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

---Advertisement---

नुकत्याच पार पडलेली लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढली होती. या निवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठं यश मिळवलं. आता त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी आणि अन्य छोटे- मोठे पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत अशी मोठी घोषणा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्ही ३ पक्ष जरी एकत्र असलो तरी महाराष्ट्रातील आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिष्ट पक्ष, ३० हुन अधिक संघटना आमच्या सोबत होत्या. या सर्वांनी मेहनत केली, महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. यापुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही अशाच एकत्रितपणे लढवणार आहोत. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

---Advertisement---

Mahavikas Aghadi ची पत्रकार परिषद

विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विजयामुळे महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. आता त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांवर पण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंमोदींना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असा टोला पवारांनी लगावला.

दरम्यान, या निर्णयामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. कारण आताच झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीने भाजपसह मित्र पक्षांना मोठा धक्का देत अनेकांचा पराभव केला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

---Advertisement---

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles