Friday, November 22, 2024
Homeराज्यसुकुमार दामले यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार; नागपूर येथे वितरण

सुकुमार दामले यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार; नागपूर येथे वितरण

नागपूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या93 व्या निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते 25 वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे8 शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना  घरे मिळालेत आहेत,  नांदगाव विधानसभेचे आमदार, 6 वर्ष विधांपरिषेद , विरोधी पक्षनेते, भाकप चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे. 

कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक  शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात. आज कॉम्रेड माधवराव गायकवाड  जन्मदिनी 2022 ह्या वर्षी कॉम्रेड माधवराव गायकवाड  4 था स्मृती जीवनगौरव  पुरस्कार  कॉम्रेड सुकुमार दामले(दिल्ली)यांना  आज कॉम्रेड माधवराव गायकवाड 18 जुलै 2022 जयंती दिनी जाहीर केला होता. रोख रक्कम 31 हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र, शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

• राजकीय व चळवळीतील परिचय : सुकुमार वासुदेव दामले

जन्म हैदराबादला आजोळी झाला. 3 नोव्हेंबर 1948 शिक्षण : प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला म्युनिसिपल शाळेत, त्यानंतर प्रताप हायस्कूल पाचवीपर्यंत, बुलढाण्याला एडेड हायस्कूल सहावी, सातवी परत प्रताप हायस्कूल, अमळनेर. त्यानंतर आठवी, नववी, दहावी सांगली टेक्निकल स्कूल, त्यानंतर मॅट्रिक मॉडर्न हायस्कूल,पुणे, पुढे प्री-युनिव्हर्सिटी, जानकीदेवी बजाज कॉलेज, वर्धा. त्यानंतर आय.आय.टी., कानपूर 1965 ते 1970 बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी.

नोकरी : भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई त्यानंतर ही नोकरी सोडली आणि मर्चंट नेव्ही मध्ये माझगाव डॉक मुंबईमध्ये एक वर्ष ट्रेनिंग त्यानंतर मरीन इंजिनिअर म्हणून जून 75 ते फेब्रुवारी 77 पर्यंत काम केलं. त्यानंतर ही नोकरी सोडून दिली आणि 1977 पासून आयटक या संघटनेमध्ये अंधेरी ट्रेड युनियन सेंटरमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. त्यानंतर मुंबईतील बऱ्याच युनियन्सशी संबंध आला. आयटक(महाराष्ट्र)चा जनरल सेक्रेटरी 1995 साली झाले. 2015 साली अध्यक्ष  आणि 2017 पासून नॅशनल सेक्रेटरी म्हणून आयटक मुख्यालयात दिल्लीला कार्यरत आहेत. भविष्य निर्वाह निधी च्या सि बी टी चे सदस्य आयटक चे प्रतिनिधी आहेत. अंधेरी ट्रेंड युनियन सेन्टर च्या माध्यमातून अनेक कामगार ना कायम केले आहे. कामगारांना स्वस्तात घर मिळावे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 

असंघटित कामगार ना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. घरकामगार मोलकरीण संघटना मुंबई येथे उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. रेशन प्रश्न, वर काम केले आहे. सद्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना( आयटक) चे अद्यक्ष आहेत. आयटक नेतेकॉम्रेड ए बी वर्धन, कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता,  कॉम्रेड गंगाधर चिटणीस,  कॉम्रेड धुमे, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड माधवराव गायकवाड, आदींच्या नेतृत्व खाली काम केले आहे. आज ही आयटक राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमर जित कौर, भाकप नेते डॉ. भालचंद्र कांगो सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अश्या लढाऊ नेत्यास, श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणाऱ्या समतेचे राज्य प्रस्तपित व्हावे यासाठी कार्यरत आयटक राष्ट्रीय नेते कॉम्रेड सुकुमार दामले वय 75 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड  जीवनगौरव स्मृती पुरस्कार आयटकच्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. अमरजित कौर यांच्या हस्ते व भाकप राष्ट्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आयटक राष्ट्रीय सचिव मोहन शर्मा, बबली रावत, सी. जे. जोसेफ, आयटक राज्य सरचिटीस श्याम काळे, प्रकाश बनसोड उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एन. जे. शर्मा राहतील. मान्यवर च्या उपस्तीतीत वितरण करण्यात येणार आहे. या आदी हा पुरस्कार शेतकरी नेते राजू शेट्टी, एम. ए. पाटील, मोहन शर्मा, यांना 9 जानेवारी 2023रोजी दुपारी 1 वा. परवाना भवन नागपूर येथे गौरव करण्यात येणार. आहे. अशी माहिती  स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था च्या अध्यक्षा अॅड. साधना गायकवाड, सचिव कॉम्रेड राजू देसले, विश्वस्त भास्कर शिंदे, कुसुमताई गायकवाड, रिकब जैन, सुभाष बेदमुथा, छबूशेठ शिरसाठ, मिखील स्वर्ग, व्ही डी धनवटे, कॉम्रेड दत्तू तुपे आदीने केले आहे.

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय