Friday, April 19, 2024
Homeआंबेगावमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामांबाबतची आढावा बैठक संपन्न 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामांबाबतची आढावा बैठक संपन्न 

आदिवासी भागातील मजुरांच्या हाताला मिळणार काम !

जुन्नर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील मजुरांकडून दर वर्षी मोठ्या प्रमाणावर कामाची मागणी केली जाते. जानेवारी ते जुन या ६ महिन्यात जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागातील मजुरांना अल्प प्रमाणात रोजगार उपलब्ध असतो. मोठ्या संख्येने मजुर रोजगारासाठी गावातून स्थलांतर करून इतरत्र जातात. महिला मजूर तर रोजगाराअभावी घरीच बसून असतात. युवक युवती महानगरांचा आसरा घेतात. या भागातील मजुरांचा कौटुंबिक उदरनिर्वाह पूर्णपणे मजुरीवर अवलंबून असल्याने काम मिळाले नाही तर कुटुंबावर आर्थिक संकटे निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये रोजगार हमीची कामे सुरु करण्याची मागणी या भागातून सातत्याने होत असते. 

किसान सभेच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून सातत्याने रोजगार हमीची कामे चालू करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून काही गावांमधील मजुरांना काम मिळवून देण्यात यश मिळविले. रोजगार मिळण्याने आणि वेळच्या वेळी मजुरांना कामाचे पैसे मिळण्याने या कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो. मागील काळात प्रशासनाने पुरेशा प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून न दिल्यामुळे अनेक मजुरांना कामाची मागणी करूनही काम मिळू शकले नव्हते. यासाठी किसान सभेने दिनांक २३ ते २५ असे तीन दिवस पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन केलेले होते. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही यापुढे रोजगार कमी पडू दिला जाणार नाही आणि मागेल त्याला काम मिळेल असे अश्वासन संघटनेला दिलेले होते. यानुसार भविष्यात कामची मागणी होऊ शकेल अशा १७ ग्रामपंचायत मध्ये पुरेसा शेल्प तयार करणे. यापैकी गोद्रे, हिवरे तर्फे मिन्हेर, सुकाळवेढे, जळवंडी, घाटघर, कोपरे या ग्रामपंचायत मध्ये सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी काढणे. सर्व लाईन डिपार्टमेंट कडून कामासाठी नियोजन करून घेणे. पडकई सारख्या कामांचा रोजगार हमीमध्ये समावेश करणे. यासाठी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ३ जानेवारी २०२३ रोजी जुन्नर येथे किसान सभा आणि अंमलबजावणी यंत्रणा यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. 

या वेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे, वन विभागाचे एस. एस. बैचे, एस.एम. गिते, नायब तहसिलदार प्रविण कोटकर, सामाजिक वनीकरण विभागाचे बी. एम. टोणपे, छोटे पाठबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रशांत बाबर, पाठबंधारे विभाग नारायणगावचे उल्हास भोर, ए. पी. ओ. दुर्गेश गायकवाड, सी. डी. इ. ओ. राजु कुऱ्हाडे, किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, उपाध्यक्ष मुकुंद घोडे, सहसचिव शंकर माळी, संदीप शेळकंदे, प्रियांका उतळे, गोद्रे ग्रामपंचायत सदस्य दिपाली उतळे उपस्थित होते.

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय