Wednesday, April 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. (Weather update)  (हेही वाचा – मोठी बातमी : 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार, सामान्यांना मिळणार दिलासा)

---Advertisement---

हवामान खात्याच्या मते, मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या पश्चिम भागात सोमवारपासून हलक्या पावसाला सुरुवात होऊ शकते. मुंबईत कालच तापमानाने 36.3 अंश सेल्सिअसची पातळी गाठली होती, ज्यामुळे उष्णता आणि दमटपणाने नागरिक हैराण झाले होते. आज, 31 मार्च रोजी तापमान 33 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असली तरी, 1 ते 4 एप्रिल दरम्यान असामान्य हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.  (हेही वाचा – मोठी बातमी : व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान कारमध्ये मोठा स्फोट)

(Weather update)

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पीकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचे मोठे विधान)

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles