Buldhana Nails Loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या केस गळतीच्या संकटाने आता आणखी गंभीर स्वरूप धारण केले आहे. केस गळती आणि टक्कल पडण्याच्या घटनांनंतर आता काही गावांमध्ये नागरिकांच्या नखं गळून पडत असल्याच्या धक्कादायक तक्रारी समोर येत आहेत. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांमध्ये डिसेंबर २०२४ पासून केस गळतीच्या घटना समोर येऊ लागल्या. सुरुवातीला डोक्याला खाज येणे, त्यानंतर तीन ते चार दिवसांत केस गळून टक्कल पडणे अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. आरोग्य विभागाने पाण्यातील नायट्रेट आणि टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) चे वाढलेले प्रमाण आणि रेशनच्या गव्हातील सेलेनियमचे जास्त प्रमाण यांना कारणीभूत ठरवले होते. (हेही वाचा – संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू)
बुलढाण्यात नखं गळून पडण्याच्या घटना | Buldhana Nails Loss
आता, मार्च-एप्रिल २०२५ मध्ये, केस गळतीच्या तक्रारींपाठोपाठ नखं गळून पडण्याच्या घटना समोर येत आहेत. (Buldhana Nails Loss) विशेषतः बोंडगाव या गावामध्ये नागरिकांच्या नखांना खाज येणे, नखं पिवळी पडणे आणि काही दिवसांत नखं पूर्णपणे गळून पडणे असे लक्षणे दिसत आहेत. या नव्या संकटाने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे पथक यापूर्वी केस गळतीच्या प्रकरणात तपासासाठी बुलढाण्यात दाखल झाले होते. मात्र, त्यांचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. नखं गळण्याच्या नव्या तक्रारींमुळे ICMR चे पथक पुन्हा तपासासाठी येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त टिव्ही 9 मराठीने दिलेली आहे. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)