बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारताच्या ७५ वा स्वातंत्र्य दिन आयटक कामगार केंद्र बार्शी येथे कॉ.अब्बास बागवान व कॉ.भारत भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ.तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमाला भरवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. प्रवीण मस्तूद, कॉ.अनिरूध्द नखाते, बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, धनाजी पवार, विनोद गायकवाड, सुयश शितोळे आदी उपस्थित होते.