पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : सीए हा कोर्स जागतिक दर्जाचा मानांकन प्राप्त कोर्स आहे. सीएचा सल्ला घेण्यासाठी नामांकित मंडळी येतात ज्यांना भेटण्यासाठी आपण स्वप्नात विचार करीत नाही. सीए हा नागरिक आणि सरकार यांच्यात मध्य साधणारा एक पुल आहे. एवढेच नाही तर युनायटेड अरब एमिरेट्स देशाची कर प्रणालीचे रचनाकार भारतीय सीए आहे. हि अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार सीए विद्यार्थी संघटनेचे (विकासा) अध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी काढले. CA is the bridge between citizen and government – CA Vaibhav Modi
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने भोसरी येथील भगवान महावीर एज्यु. सो.चे प्रितम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘करिअर काउन्सलिंग अॅण्ड चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य सदाशिव कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख सहा. प्रा. विभा ब्राम्हणकर, किरण सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांसाठी चार्टर्ड अकाउन्टसी कोर्स या विषयावर मार्गदर्शन सत्रात सीए यश कुवड यांनी सी.ए. हा कोर्स पाच वर्षाचा असून त्यातील भविष्यकालीन वाटा व संधी यावर मार्गदर्शन केले.
सीए वैभव मोदी पुढे म्हणाले कि, ‘चार्टर्ड अकाउंटन्ट चा कोर्स कमी खर्चात पूर्ण करून गरिबातील गरीब विद्यार्थी सीए बनू शकतो. याचे उत्तम उदाहरण आपण स्वतः आहोत. आयुष्यात प्रत्येक कार्य करताना गांभीर्याने घ्या. काळासोबत वावरताना वेळेला किंमत द्या तरच काळ तुम्हाला किंमत दिइल अन्यथा तुम्ही काळाच्या प्रवाहातून कालबाह्य व्हाल. असा सल्ला शेवटी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रूपाली वाघ यांनी केले; तर आभार प्रा. महालक्ष्मी शिरसाठ यांनी मानले.