BSNL Recharge Plan : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन अफोर्डेबल रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही. यामुळे इंटरनेटशिवाय रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि Complimentary SMS सुविधा उपलब्ध असून तो दीर्घकालीन वैधतेसह येतो.
BSNL च्या नवीन प्लॅनची वैशिष्ट्ये :
किंमत: ₹439
वैधता: 90 दिवस
सेवा: अनलिमिटेड कॉलिंग (सर्व नेटवर्कसाठी), Complimentary SMS सुविधा
BSNL चा 439 रुपयांचा हा प्लॅन खासकरून अशा ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे ज्यांना फक्त कॉलिंगची आवश्यकता आहे आणि डेटा वापरायचा नाही. या प्लॅनमुळे मोबाईल सिम सक्रिय ठेवणे सोपे झाले आहे आणि ग्राहकांना अनावश्यक डेटासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
ग्राहकांच्या गरजेनुसार BSNL Recharge Plan :
गेल्या काही वर्षांत अनेक मोबाईल वापरकर्त्यांनी इंटरनेट न वापरणाऱ्या प्लॅनची मागणी केली होती. मात्र, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांनी डेटा असलेलेच प्लॅन बाजारात उपलब्ध केले होते. BSNL च्या या नवीन प्लॅनमुळे डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिओचा 49 रुपयांचा नवीन प्लॅन:
दुसरीकडे, जिओने आपला सर्वात स्वस्त ₹49 चा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये Fair Usage Policy (FUP) अंतर्गत अनलिमिटेड डेटा उपलब्ध आहे. ग्राहकांना एका दिवसात 25GB पर्यंत डेटा वापरता येईल. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट सेवा थांबवली जाईल.
BSNL आणि जिओच्या या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना वेगवेगळ्या गरजांनुसार पर्याय मिळत असून दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.


हे ही वाचा :
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर
चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरने 15 वाहनांना उडवले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी
अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता
मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी