Tuesday, January 28, 2025

Breaking : हिजबुल्लाचे इस्रायलच्या हैफा शहरावर रॉकेट हल्ले

जेरुसलेम : इस्रायलने लेबनॉन आणि गाझा शहरावर भयानक हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत.
तरी सुद्धा इस्रायलचे तिसरे मोठे शहर हैफा येथे हिजबुल्लाने अनेक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स डागली. (Breaking)

टाइम्स ऑफ इस्रायल दिलेल्या वृत्तानुसार हेजबुल्ला या दहशतवादी संघटनेने मंगळवारी
हैफाच्या दक्षिणेस असलेल्या इस्रायली लष्करी तळावर मध्यम पल्ल्याच्या फादी-1 क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे.

त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हैफा येथे दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि ६५ किलोमीटर दूर असलेल्या तिबेरियास शहरावर पाच रॉकेट्स पडली. (Breaking)

त्यांचे कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झालेले आहेत. तरीही रॉकेट हल्ले इस्रायलच्या शहरांना त्यांनी टार्गेट करून रॉकेट हल्ले केले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles