Phule Movie Controversy : महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट येत्या ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला ब्राह्मण महासंघाच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील काही दृश्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे.
ब्राह्मण महासंघाचा कशावर आहे आक्षेप ? | Phule Movie
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी चित्रपटाच्या टीझरमधील काही दृश्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकताना दाखवला आहे. तसेच लग्नात गेले म्हणून महात्मा फुलेंना मारहाण झाल्याच्या घटनेवर आनंद दवे यांनी सिनेमा जातीय तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असं म्हटलं आहे. सिनेमा एकतर्फी नको. चित्रपटात ब्राह्मण समाजाच्या सकारात्मक योगदानाचाही समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आनंद दवे यांनी म्हटले आहे की, पुण्यात शाळेसाठी जागा देणारे भिडे असो, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वत:ची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोकं असो.. असं अनेकांनी सहकार्यसुद्धा केलं आहे. मग तुम्ही ते दाखवणार आहात का? किंवा ते दाखवलं आहे का? असा सवाल दवे यांनी विचारला आहे. (हेही वाचा – नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा, पुरुष आयोगाची केली मागणी)
ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
‘फुले’ हा चित्रपट ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. या दाम्पत्याने १९व्या शतकात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली आणि जातिव्यवस्थेविरुद्ध लढा दिला. चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी ज्योतिबा फुले यांची, तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी या चित्रपटाद्वारे फुले दाम्पत्याच्या सामाजिक सुधारणांचा वारसा नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा – धक्कादायक : टार्गेट पूर्ण न केल्याने कामगारांना कुत्रा बनवले, प्रायव्हेट पार्टला स्पर्श व्हिडिओ व्हायरल)
ज्योतिबा फुले यांनी आपल्या कार्यातून जातिव्यवस्था आणि ब्राह्मणवादावर कठोर टीका केली होती. त्यांच्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकातून त्यांनी ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना उच्चवर्णीय समाजाकडून, विशेषतः ब्राह्मणांकडून, प्रचंड विरोध झाला होता. त्यांच्यावर कीचड आणि शेण फेकण्याच्या घटना घडल्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांत आढळतो. या चित्रपटातील वादग्रस्त दृश्य हा त्या काळातील वास्तवाचा भाग असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)
या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ब्राह्मण महासंघाने हे दृश्य न हटवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर चित्रपटाचे समर्थक या वादाला सामाजिक सुधारणांच्या इतिहासाचा भाग म्हणून पाहत आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)