Saweety Boora And Deepak Hooda Controversy : भारताचा माजी कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा आणि जागतिक विजेती बॉक्सर स्वीटी बूरा, यांच्यातील वैवाहिक वाद आता चांगलाच चिघळला आहे. या दोघांमधील संघर्षाने आता नवे वादग्रस्त वळण घेतले असून, स्वीटी बूराने दीपक हुड्डावर समलैंगिक (गे) असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे क्रीडा विश्वात आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
स्वीटी बूरा आणि दीपक हुड्डा यांची शादी 7 जुलै 2022 रोजी झाली होती. दोघेही आपापल्या क्षेत्रातील यशस्वी खेळाडू असल्याने त्यांच्या लग्नाला क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. दीपक हुड्डा हा भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार असून, त्याने 2016 च्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. दुसरीकडे, स्वीटी बूरा ही आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून, तिने 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दोघांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्यातील संबंध बिघडले. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)
स्वीटीचे सनसनाटी आरोप | Deepak Hooda
स्वीटीने दीपकवर दहेज आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप लावत 11 फेब्रुवारी 2025 रोजी हिसार येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिने दीपकवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा दावा केला. स्वीटीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दीपकने तिला मारहाण केली, दहेजाची मागणी केली आणि अनेकदा घरात बंदिस्त ठेवले. स्वीटीने दावा केला की, दीपकने तिच्याकडून एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती, आणि ती पूर्ण झाल्यानंतरही त्याचा छळ थांबला नाही. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)
23 मार्च रोजी स्वीटीने हिसार येथे पत्रकार परिषद घेऊन दीपकवर अनेक गंभीर आरोप केले. तिने सांगितले की, दीपकने तिला गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकला. पण 25 मार्च रोजी तिने आणखी एक पाऊल पुढे टाकत दीपकवर समलैंगिक असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, “माझ्या पतीला मुलींमध्ये नाही, तर मुलांमध्ये रस आहे. माझ्याकडे याचे अनेक पुरावे आहेत, जे मी न्यायालयात सादर करेन.” तिने असाही दावा केला की, दीपकने तिच्याशी लग्न फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी केले होते आणि तो बहुतेक वेळ घराबाहेर राहायचा. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)
स्वीटीने हिसारच्या पोलिस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांच्यावरही दीपकशी संगनमत असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, “पोलिस ठाण्यातील व्हिडिओ तोडून-मोडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यात दीपक मला शिवीगाळ करत असल्याचा आणि मला पॅनिक अटॅक आल्याचा भाग दाखवला गेला नाही. हे सर्व दीपक आणि एसपी यांच्या मिलीभगतीने झाले आहे.” (हेही वाचा – धक्कादायक : दौंडमध्ये कचराकुंडीत प्लास्टिकच्या डब्यात आढळले मृत अर्भके)
दीपक हुड्डाने दिले प्रत्युत्तर
दीपक हुड्डाने स्वीटीच्या आरोपांना निराधार ठरवले आहे. त्याने सांगितले की, स्वीटी आणि तिच्या कुटुंबाने त्याची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मानसिक त्रास दिला. त्याने रोहतक येथे स्वीटीविरोधात तक्रार दाखल केली असून, तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आणि झोपेत असताना डोकं फोडल्याचा आरोप केला आहे. दीपक म्हणाला, “मी माझं घर वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण स्वीटी ते तोडायला निघाली आहे.”