Friday, March 14, 2025

वडवणीसह तालुक्यात पावसाचे आगमन, वादळ वाऱ्याने तालुक्यातील विजपुरवठा खंडित

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

वडवणी (प्रतिनिधी):- वडवणी तालुक्यात रविवारी सायंकाळी अन रात्री उशिरा सर्वत्र मान्सून पावसाने हजेरी लावली तालुक्यात सरासरी वडवणी २० कौडगाव बु ३९ मि.मी , पावसाची नोंद झाली आहे,वडवणी तालुक्यात पावसाने जोर दाखवला. विजेचा कडकडाट अन वादळी वार्‍यासह पावसाने उन्हाची तीव्रता कमी केली, कालच्या वादळी वार्‍या मूळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडली , विद्युत तारा तुटल्यामुळे वडवणी येथील वीज पुरवठा खंडित झाला, वातावरणात मोठा उकाडा निर्माण झाला आहे.

           गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करणार्‍या बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी समाधानी दिसत असून शेतीच्या कामासाठी शेतकर्‍याची लगबग सुरू झाली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles