Saturday, March 15, 2025

विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या लढ्याला यश.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

प्रतिनिधी :- विजापूर गुहागर महामार्गासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा सातत्याने संघर्ष करत होते. सदर मागणीस यश मिळाल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख आणि जिल्हा सरचिटणीस दिगांबर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगतले.

            26 मे रोजी केंद्राच्या वतीने राजपत्र जाहीर केले असून, त्यामध्ये घाटनांदे, जरंडी, रायवाडी येथील बाधित शेतकर्‍यांच्या गटांची यादी आहे. त्यामुळे मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे म्हटले आहे.

            इतर महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या  गावातील गटांच्या यादी तयार करण्याचे काम ऑनलाईन सुरू आहे. ते राजपत्र लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. हे किसान सभेच्या लढ्याचे यश आहे. परंतु जो पर्यंत आपल्या बँक खात्यात मोबदला मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करावा चालू राहणार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles