बार्शी -प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिल व आयटक यांच्या वतीने “भाजप हटाव देश बचाव” ही मागणी घेऊन मा. तहसीलदार यांचे कार्यालयावर दिनांक 15 मे 2023 रोजी भगवंत मैदान येथून कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे म्हणाले “देशात भाजपाने सर्व श्रमजीवी वर्गाला उध्वस्त करण्याचे काम भाजपने आखले आहे, संविधान मूल्य संपवणे, शेतकरी कामगार विरोधी धोरण आखणे, महागाई -बेरोजगारी, सामाजिक तेढ वाढवने, अनैतिक पद्धतीने सत्ता काबीज केल्या आहेत, अल्पसंख्यांक दलित यांच्यावरील हल्ले वाढवले, खेळाडूंचे लैंगिक शोषण करणे , लेखक – विचारवंत -साहित्यिक- कलाकार यांना छळणे हे काम केले आहे त्यामूळे जनताच भाजपला हटवेल.”
यावेळी नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी निवेदन स्वीकारले, मोर्चाचे निवेदन कॉम्रेड प्रांजली कदम, नागेश मिरगणे , शितल करडे यांनी दिले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, बांधकाम कामगार संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय संघटना, कंत्राटी नर्सेस संघटना चे कॉम्रेड एबी कुलकर्णी, कॉ. डॉ.प्रवीण मस्तुद , अनिरुद्ध नखाते, लहू आगलावे, धनाजी पवार , भारत भोसले , आनंद गुरव, शौकत शेख, भारती मस्तुद, तानाजी बागल, संगीता गुंड, सिद्धेश्वर कांबळे, सतीश गायकवाड, मुबारक मुलाणी, रशीद इनामदार, संपत घोडे, सुवर्णा नेंदणे , सरस्वती उंबरे, स्नेहलता देशपांडे , अलका स्वामी , उज्वला काटे, नानासाहेब ठाकरे, बालाजी ठाकरे, राजू ढेंबरे, दशरथ भालके, राम कोळी , जयराम सराफ, जयवंता अमले आदी उपस्थित होते.