(पुणे) :- महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची एप्रिल, मे, जून या महिन्यातील विज बिल माफ करा अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष दशरथ मडावी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
बिरसा क्रांती दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च पासून संपूर्ण राज्यात आणि देशात लाँकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद झाले लोक रिकाम्या हाताने घरी बसून होते कुठेही काम आणि आवक होत नव्हती थोडे बहुत साठलेले पैसे या लाँकडाऊनच्या काळात संपले. लोकांच्या हातात कुठल्याही प्रकारचा पैसे नाही तेव्हा ते कुठल्या पैशातून वीज बिल भरणार आहेत? वीज बिलाची रक्कम पाहून तर अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे, ज्यांना 500,1000 रक्कमेचे बिला यायचे त्यांना 10 हजार, 20 हजार रुपयांचे बिले आली आहेत.
महामंडळाचे वीजबिल करण्याची पद्धत 100 युनिटपर्यंत 3रू .46 पैसे, 100 ते 300 युनिटचे 7 रुपये 43 पैसे, 300 ते 500 युनिट चा 10 रुपये 42 पैसे, आणि 500 युनिट च्या पुढे 11 रुपये 71 पैसे अशा प्रकारे आकारणी केली जाते या शिवाय स्थिर आकार, व वहन आकार, इंधन समायोजन वीज शुल्क 16% इतर अशा प्रकारचा अधिभार ग्राहकांवर लादल्या जातो. आज सरसकट तीन महिन्याचे बिल लावून आकारणी केली आहे, आधीच काम धंदा नसल्यामुळे रिकामा झालेला माणूस या विज बिल यामुळे अधिक दहशतीत आला आहे, बिलाची आकारणी करताना खर्च झालेल्या विनयचे समान चार भाग करून त्याला घरगुती दराने देण्यात यावे, बिला सोबत लावलेले अधिभार रद्द करण्यात यावे हा काळ व लोकांची परिस्थिती लक्षात घेऊन या मागण्यांचा विचार करून तात्काळ सोडण्यात यावी, अशी मागणी बिरसा दलाने केली आहे.
निवेदनात बिरसा क्रांती दल राज्य महासचिव प्रमोद घोडाम, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कैलास बोके, महासचिव प्रफुल्ल कोवे, अविनाश बनसोड, राजाभाऊ पावशेकर, संजय माटे, विनोद काळे यांच्या सह्या केल्या आहेत.