Sunday, March 16, 2025

शी जिनपिंग यांच्याशी आपले “विशेष वैयक्तिक संबंध” आहेत; माकप नेते महोम्मद सलीम यांनी केला मोदींचा जुना व्हिडिओ शेअर

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

(कोलकत्ता) :- भारत आणि चीन मध्ये झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते,  त्यानंतर देशभरातून एक संतापाची लाट उसळली होती. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून चीनच्या विरोधात आंदोलन करत चिनी वस्तूंची तोड फोड केली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुखसमवेत त्यांनी लडाखला अचानक भेट दिली होती. त्यावेळी मोदींनी जवानांना संबोधित केले होते.

      अशातच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार महोम्मद सलीम यांनी मोदींचा जुना एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात नरेंद्र मोदींनी गुजरातच्या सभेत सांगितले होते की, शी जिनपिंग ज्यावेळी गुजरातला आले होते त्यावेळी गुजरात मध्ये त्याचे स्वागत झाले होते, त्यावेळी ते म्हणाले होते की,  आपले “विशेष वैयक्तिक संबंध” आहेत, असे मोदी सांगत आहेत. सलीम यांनी ती व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, मोदींचे शी जिनपिंग यांच्याशी “विशेष वैयक्तिक संबंध” आहेत, ते उघडकीस आले असूनही भारताबद्दल चीनच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षेबद्दल त्यांना माहिती होती. पुढे त्यांनी प्रश्न विचारला आहे की, लडाखमधील आपल्या सैनिकांच्या जीवापेक्षा वैयक्तिक संबंध अधिक महत्वाचे आहेत का?

        नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना चीनला 4 वेळा आणि पंतप्रधान असताना 5 वेळा भेट दिली. परंतु दोन दशके कम्युनिस्ट सरकार असताना कॉम्रेड ज्योतीबसू मुख्यमंत्री असूनही देखील चीनला केवळ 1 भेट दिली होती, कारण चीनचा अध्यक्ष आमचा अध्यक्ष नाही! असे सलीम यांनी म्हंटले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles