Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी...

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मुंबई : देशात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. सोन्याचा भाव तब्बल 73 हजारांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे, यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. (gold and silver)

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सोन्याचे सीमाशुल्क 15 टक्के होते, आता ते थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाली आहे.

जळगावच्या आणि पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम त्वरित दिसून आला. सोनं खरेदीसाठी दुकाना गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना 2 तासांतच प्रति तोळा सोन्यामागे 3 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही तीन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 73 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. (gold and silver)

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल तीन हजार रुपयांनी सोन्याने चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Gold and silver

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

संबंधित लेख

लोकप्रिय