Saturday, February 8, 2025

मोठी बातमी : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव

नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानभा मतदारसंघात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. (Arvind Kejriwal)

भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून राजकारणात आलेले आणि आम आदमी पक्षाची स्थापना करणारे अरविंद केजरीवाल स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले. या प्रकरणामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि मुख्यमंत्रीपदही गमवावे लागले. या पराभवामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

फक्त केजरीवालच नव्हे, तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच केजरीवाल पिछाडीवर होते आणि शेवटी त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपने मोठी आघाडी घेतली असून आम आदमी पक्षाच्या भविष्यासाठी ही मोठी परीक्षा ठरणार आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles