Sunday, January 19, 2025

Beauty of guhagar : उत्तर कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनारा गुहागर

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले गुहागर हे तालुक्याचे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘गुह’ म्हणजे कार्तिकस्वामी, त्यांनी संरक्षिलेले ‘आगर’ म्हणून गुहागर असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील जवळजवळ अस्पर्शित, लक्ष न दिलेला समुद्रकिनारा. वेळणेश्वर जवळ, हे ठिकाण मुख्य मार्गावरून येण्या-जाण्यासाठी अगदी काही किमी अंतरावर येते. (Beauty of guhagar)

या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला काही उत्तम रिसॉर्ट्स आहेत, तसेच आदरातिथ्य सेवा मिळणारी स्थानिक रहिवाशांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. खडकाळ समुद्राच्या आत असलेल्या खडकाळ फाट्याच्या एका बाजूला एक वेगळा समुद्रकिनारा आहे, तर दुसऱ्या बाजूला एक खडकाळ टेबल लँड आहे ज्यावर लाटा कोसळतात. गुहागरचा बीच स्वच्छ आणि निर्मळ आहे, तुम्हाला इथे एकांतात शांतता आणि आनंद मिळेल.

येथील आसपासच्या गावात निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केली आहे.
गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याची तब्बल सात किलोमीटर लांबी आहे. चेन्नई येथील मरीना बीच १२ किलोमीटर असून, तो जगात तिसऱ्या स्थानावर आहे. सलग सात किलोमीटर लाभलेली गुहागरची किनारपट्टी व स्वच्छ असून समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात डुंबण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही.

Beauty of guhagar

गुहागरमधील समुद्रकिनारे गुहागर, पालशेत, अडूर – बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ इत्यादी ठिकाणी तुम्ही पर्यटन करू शकता.

येथील प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिर, दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वर मंदिर, हेदवी दशभुज गणेश मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे तुम्हाला अध्यात्मिक आनंद देतात.

येथे घरगुती पद्धतीची फिश थाळी,फिश फ्राय अस्सल उत्तर कोकणी पद्धतीने बनवलेले असतात. येथे कोकणातील चवदार कोंबडी वडे आणि व्हेज थाळी सर्व काही उपलब्ध आहे. येथील स्वच्छ निळेशार सागराच्या लाटा आणि समुद्राची गाज यामुळे तुमच्या पर्यटनाचा स्वर्गीय आनंद तुम्हाला प्राप्त करून देतो. तर निघा गुहागरला चिपळूण मार्गे!



Related Articles

- Advertisement -

Latest Articles