Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यसावधान ! उन्हाळ्यात मेथी अधिक प्रमाणात खाताय ?

सावधान ! उन्हाळ्यात मेथी अधिक प्रमाणात खाताय ?

मानवी शरीरासाठी पोषक अन्नद्रव्यांची नितांत गरज असते. कडधान्य, पालेभाज्या, फळे, कंदमुळे हे शरीरासाठी लागणाऱ्या पोषक घटकांची स्रोत आहेत. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मात्र त्या ताज्या आणि ऋतूमानानूसार असाव्यात.

मेथी हि हिरव्या पालेभाज्यांपैकी सर्वाधिक आणि सातत्यपूर्ण वापरली जाणारी भाजी आहे. क्वचितच लोकांना मेथी आवडत नसेल. मानवी शरीरासाठी संतुलित आहाराची नितांत गरज असते. पंरतु उन्हाळ्यात अधिक प्रमाणात मेथी खाल्यास काही त्रासांना सामोरं जावं लागतं. तर जाणून घेऊयात.

वाचा सविस्तर ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?

उन्हाळ्यात मेथी अधिक प्रमाणात खाल्ल्याने होणारे त्रास

– मेथीमध्ये शरीरातील उष्णता वाढवणारे घटक असतात, म्हणून उन्हाळ्यात मेथी कमी प्रमाणात खावी. 

– शरीरात उष्णता वाढल्याने तोंड येणे, पाईल्स, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे सेवन करणे लाभदायक आहे. कारण शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी, शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.

– मेथी जास्त खाल्ल्यामुळे अतिसाराचा त्रास होतो.

– मेथीमुळे शरीरातील उष्णता वाढत असल्याने गर्भवती स्त्रियांना मेथीचे अतिप्रमाणात सेवन करू नये. तसेच मेथी बीज जास्त खाल्ल्यास आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो.

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ?

टीप : सदरील माहिती वाचकांसाठी उपयुक्त माहिती म्हणून देण्यात येत आहे ‌. महाराष्ट्र जनभूमी याबाबत कोणताही दावा करत नाही.


संबंधित लेख

लोकप्रिय