Thursday, February 13, 2025

मान्सूनपूर्व पावसाची 17 मार्च पासून बॅटिंग सुरू होणार

मुंबई :देशातील 17 राज्यात अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.करडई,हरभरा,गहू,ज्वारी, फळे आणि भाजीपाला यासारखी पिके शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढावीत. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी.असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

मंगळवारी सायंकाळी 7 नंतर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. संध्याकाळ नंतर पुणे,पिंपरी चिंचवड, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर सातारा, नाशिक, पुणे येथे विजांचा कडकडाट,अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात,सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील 3-4 ठिकाणी गारपीट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 मार्चपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.

17 मार्चपासून कर्नाटक,केरळ,गोवा,महाराष्ट्राचा पश्चिम तटीय किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओडिशा,बंगाल, बिहार,झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची सुरवात होणार आहे.20 मार्च रोजी हवामान खात्याने संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मराठवाडा,विदर्भ व पूर्वेकडील राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. देशातील तापमानवाढ पाहता एकूण 17 राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन पाऊस पडणार आहे.

17 मार्चपासून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये पावसाच्या हालचाली सुरू होणार आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्स उद्या पश्चिम हिमालयापर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या हालचाली सुरू होणार आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्स उद्या पश्चिम हिमालयापर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.पडला आहे. यासोबतच अनेक भागात मेघगर्जनेसह गारपीटही होत आहे. याशिवाय पंजाबच्या अनेक ठिकाणांसह पश्चिम राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशच्या एक-दोन ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles