Monday, February 3, 2025

‘या’ बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, वाचा बँकांचे व्याजदर

मुंबई : अनेक बँकांनी त्यांच्या एमसीएलआर (Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये सुधारणा करत गृहकर्जाचे व्याजदर बदलले आहेत. रिझर्व्ह बँकेने आपल्या शेवटच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर स्थिर ठेवला असला, तरी अनेक बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात घट केली आहे. (Home loan)

युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे (Home loan)

युनियन बँक ऑफ इंडिया ८.३५% या सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. ७५ लाख रुपयांच्या २० वर्षांच्या गृहकर्जासाठी दरमहा ६३,९०० रुपये ईएमआय द्यावा लागणार आहे.

८.४% व्याजदर – बँक ऑफ बडोदा, पीएनबी, इंडियन बँक आणि अन्य बँका
बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि आयडीबीआय बँक ८.४% व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. या कर्जावर ७५ लाख रुपयांच्या २० वर्षांच्या मुदतीसाठी ६४,२०० रुपये ईएमआय लागेल.

कॅनरा आणि सेंट्रल बँकेचे ८.५% दराने गृहकर्ज

कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया ८.५% व्याजदराने गृहकर्ज देत असून, यावर दरमहा ६४,६५० रुपये ईएमआय होईल.

कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर ८.७%

कोटक महिंद्रा बँक ८.७% दराने गृहकर्ज देत असून, ७५ लाख रुपयांच्या कर्जासाठी ६४,५५० रुपये ईएमआय द्यावा लागेल.

ॲक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेचे दर ९%

ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक दोन्ही ९% दराने गृहकर्ज देत आहेत. यासाठी अनुक्रमे ६५,७५० आणि ६६,९७५ रुपये ईएमआय भरावा लागेल.

एसबीआय आणि एचडीएफसीचे व्याजदर सर्वाधिक

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ९.१५% दराने गृहकर्ज देत असून, यावर ७५ लाखांच्या कर्जासाठी ६७,७२५ रुपये ईएमआय असेल. एचडीएफसी आणि येस बँक ९.४% दराने गृहकर्ज देत असून, त्यावर ६८,८५० रुपये ईएमआय लागणार आहे.

ही सर्व माहिती गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे दर तपासून योग्य निर्णय घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : सापुतारा येथे बस दरीत कोसळून 7 मृत्यूमुखी, 15 जखमी

शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles