Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. 16 दिवसांच्या बँक सुट्ट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे.
या कालावधीत बँक बंद असल्या तरी देखील नागरिकांना मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आपले व्यवहार आणि काम पूर्ण करता येणार आहे.
बँकांच्या सुट्टयांची यादी पुढीलप्रमाणे :
▪️1 जानेवारी – नववर्षाभिनंदन
▪️7 जानेवारी – रविवार
▪️11 जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
▪️12 जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती
▪️13 जानेवारी – दुसरा शनिवार
▪️14 जानेवारी – रविवार
▪️15 जानेवारी – पोंगल
▪️16 जानेवारी – तुसू पूजा
▪️17 जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
▪️21 जानेवारी – रविवार
▪️23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
▪️25 जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
▪️26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
▪️27 जानेवारी – चौथा शनिवार
▪️28 जानेवारी – रविवार
▪️31 जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम)
