जालना : आशा सेविका व गट प्रवर्तकांचे २७ फेब्रुवारी पासून होणाऱ्या पोलिओ लसिकरणावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. आशा सेविका व गट प्रवर्तकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी नंतर लसीकरण करा, अशी मागणी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना (सिटू ) तर्फे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणे व लागोपाठ विविध सर्वे करून माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आशा वर्कर करत राहिल्या. केंद्राने तर कोणताही निधी मंजूर केलेला नाही. ऑक्टोबर २०२१ पासून केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. सप्टेंबर २०२१ पासून राज्य सरकारने वाढ केलेले आशाना २००० रुपये व गट प्रवर्तकांना ३००० रुपये हा निधी सुद्धा मिळालेला नाही.
शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा – नरसय्या आडम
१ जुलै २०२१ पासून राज्य शासनाने जाहीर केलेली आशाना १५०० रुपये व गट प्रवर्तकाना १७०० रुपये ची वाढ याची तर अद्याप पर्यंत अंमलबजावनीच झालेली नाही. निधीची तरतूदही केलेली नाही. कामे मात्र वेठबिगारासारखे करून घेतली जात असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हा सरचिटणीस गोविंद आर्दड यांनी केला आहे.
आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१) सर्व थकीत मानधन वाढीव निधीसह त्वरित वाटप करण्यात यावे.
२) राबवत असताना अल्प मोबदला देण्यात येतो.तो किमान ३०० रूपये रोज देण्यात यावा.
व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
३) आशा व गटप्रवर्तक यांना कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन किमान समान वेतन देण्यात यावे.
४) हर घर दस्तक व कवच कुंडल सर्व्हेचे काम करून मोबदला देण्यात आलेला नाही, तो देण्यात यावा.
५) एक्सपायरी डेट जवळ आल्यानंतर औषध वाटप जिम्मेदारी आशाला देण्यात येतं, ते काम आधीच देण्यात यावे
६) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दोन हजार वीस पासून शासनातर्फे कोणतीही स्टेशनरी देण्यात आलेली नाही. त्याच्या निधी कुठे गेला याची चौकशी करण्यात यावी.
७) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दर महिन्यात वेळेवर मानधन देण्यात यावे. त्याचबरोबर इतर मोबदला सुद्धा वेळेवर देण्यात यावा.
८) कोविड लसीकरणाच्या कामासाठी जाहीर केल्या प्रमाणे प्रतिदिन २०० रुपये प्रति आशा भत्ता देण्यात यावा.
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती