Monday, July 15, 2024
Homeराज्यव्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : व्हाट्सअॅप वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. चॅटिंग, कॉलिंगपासून ते महत्त्वाच्या फाइल्स पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. आपण WhatsApp वर मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील अनेक ग्रुपचे सदस्य देखील असतो. अनेकदा ग्रुप अ‍ॅडमिन देखील असतो. ग्रुपवर येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाते. मात्र, आता केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

ह्या प्रकरणात याचिकाकर्ताने ‘फ्रेंड्स’ नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप (Whatsapp group) बनवला होता, त्याने आपल्यासोबत अन्य दोन व्यक्तींना अॅडमिन बनवले होते. त्यातील एकाने अश्लील वाटणारा व्हिडीओ टाकला. त्यांनतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) आणि बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अॅडमिन असल्याने याचिकाकर्त्यांला देखील आरोपी बनविण्यात आले होते. त्यानंतर याचिकाकर्त्यांने न्यायालयात धाव घेतली होती.

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

या प्रकरणावर केरळ हायकोर्टाने म्हटले आहे की, कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुप (Whatsapp group) चा अॅडमिन किंवा निर्मात्याला त्याच्या कोणत्याही सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह सामग्रीसाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले जाऊ शकत नाही. व्हॉट्सअप ग्रुपच्या अॅडमिनिस्ट्रेटर विरुद्ध पोक्सो कायद्या (POCSO Act) तील खटला फेटाळताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. 

न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयांनी निर्णय दिला आहे की व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर सदस्यांच्या संदर्भात अॅडमिनचा विशेषाधिकार हा आहे की, तो या गटात कोणालाही जोडू शकतो किंवा कोणत्याही सदस्याला काढून टाकू शकतो.

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

न्यायालयाने म्हटले आहे की, त्या ग्रुपमध्ये कोणता सदस्य काय पोस्ट करत आहे, यावर अॅडमिनचे कोणतेही नियंत्रण नसते. तो ग्रुपमधील कोणताही मेसेज बदलू शकत नाही किंवा प्रतिबंध (सेन्सॉर) करू शकत नाही. त्यामुळे, त्या क्षमतेमध्ये काम करणाऱ्या व्हाट्सअप ग्रुपचा अॅडमिन किंवा निर्मात्याला ग्रुपच्या कोणत्याही सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह मजकुरासाठी जबाबदार धरता येणार नाही. एका हिंदी वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी ! आजच अर्ज करा

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय