Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आसाराम बापू अद्याप दोषी ठरलेले नाहीत, माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे अजब विधान

मुंबई : माजी खासदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी स्वयंघोषित संत आसाराम बापू (Asaram Bapu) याच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खैरेंनी नुकतेच म्हटले की, “आसाराम बापू अद्याप दोषी ठरलेले नाहीत.” हे विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सामाजिक माध्यमांवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

---Advertisement---

विशेष म्हणजे, आसाराम बापू याला दोन वेगवेगळ्या बलात्कार प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशा परिस्थितीत खैरेंचे हे वक्तव्य अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. (हेही वाचा – भारताच्या माजी कर्णधारावर समलैंगिक असल्याचा पत्नीचा खळबळजनक आरोप)

आसाराम बापू याच्यावरील खटल्यांचा इतिहास | Asaram Bapu

आसाराम बापू, ज्याचे मूळ नाव आसूमल हरपलानी आहे, हे स्वयंघोषित संत 2013 पासून जोधपूर तुरुंगात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्याच्यावर पहिला खटला जोधपूर येथील एका अल्पवयीन मुलीशी संबंधित आहे. या प्रकरणात 15 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूरमधील त्याच्या आश्रमात आसाराम याने एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पाच वर्षांच्या सुनावणीनंतर 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूरच्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात आसाराम याच्यासह त्याच्या दोन सहाय्यकांना, शिल्पी आणि शरद यांनाही प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा झाली होती. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)

---Advertisement---

दुसरे प्रकरण गुजरातमधील आहे. सूरत येथील दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई याच्यावर 1997 ते 2006 दरम्यान बलात्काराचे आरोप केले होते. या प्रकरणात 2013 मध्ये गुन्हा दाखल झाला आणि जानेवारी 2023 मध्ये गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम याला दोषी ठरवत पुन्हा एकदा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात आसाराम याच्या पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये आसाराम यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार) आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)

आसाराम बापूवर काय म्हणाले चंद्रकांत खैरे | Chandrakant Khaire

एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आसाराम बापूवर आरोप असले तरी अजून त्यांचा सांप्रादाय संपलेला नाही, असे विधान असे म्हणत त्यांनी आसाराम बापूचे समर्थन केले आहे. पुढे खैरे म्हणाले आसाराम बापूचे अद्याप दोषी ठरलेले नाहीत. खैरेंच्या या विधानामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हे विधान नेमके कोणत्या संदर्भात केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  (हेही वाचा – धक्कादायक : दौंडमध्ये कचराकुंडीत प्लास्टिकच्या डब्यात आढळले मृत अर्भके)

आसाराम याचे समर्थक काय म्हणतात?

आसाराम याचे काही समर्थक अजूनही त्याला निर्दोष मानतात आणि न्यायालयीन निर्णयाला “षड्यंत्र” म्हणून संबोधतात. त्यांचा दावा आहे की, आसाराम याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे आणि त्याच्याविरुद्ध पुरावे अपुरे आहेत. (हेही वाचा – ‘लापता लेडीज’साठी आमिर खानचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल, एकदा बघाच !)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles