पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: रोटरी क्लब निगडी,आर्मी विशेष कमांड दल आणि महाराष्ट्र मस्केटीयर्स प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आर्मी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके, निगडी क्लबचे अध्यक्ष हरबिंदर सिंग,सचिव शशांक फडके,मनोहरलाल चिंबर,वीरचक्रप्राप्त तेजेंद्र पाल त्यागी,दादासाहेब सावंत,अक्षय सरकाटे,लकी जोशी,तेजस पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.आर.एस.पी.परेड आणि वंदेमातरम या नृत्य सादरीकरणास मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाच्या पथकाला व्दितीय क्रमांकांचे पारितोषिक मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब सावंत यांनी केले.