Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र आम आदमी पार्टी संघटनेत विविध पदांवर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या

मुंबई / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्रात आम आदमी पार्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पार्टीत विविध पदाधिकाऱ्यांची काल ( दि.09 जुलै) नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी नेते गोपाल इटालिया यांनी सदर समितीची घोषणा करताना सांगितले की, यापुढे महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची ध्येय धोरणे तसेच दिल्ली आणि पंजाब मधील जनहिताची केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवितील, तसेच राज्याच्या प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समश्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील, भ्रष्टाचाराविरोधात पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील असे ही ईटालिया यांनी सांगितले.

राज्य संघटनेच्या नियुक्तीत स्टेट कॅम्पेन ईन्चार्ज रंगा राचुरे, उपाध्यक्ष विजय कुंभार, उपाध्यक्ष धनंजय शिंदे, संघटन सचिव संदीप देसाई, अजित फाटके, नविंदर सिंग अहलुवालिया, भूषण धाकुळकर, मनिष मोडक, हनुमंत चाटे, अजित खोत, रियाज पठाण, महिला आघाडी अध्यक्षा सीमा गुट्टे, युवा आघाडी अध्यक्ष मयूर दौंडकर, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, समिती सदस्य देवेंद्र वानखेडे आणि संजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीला आणखी मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यापासून तर तालुका पर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात नियुक्त्या दिल्या जातील असे गोपाल इटालिया यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र मधील सत्ता संघर्षात आम आदमी पार्टीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या पक्षाला महाराष्ट्रात नवीन स्थान देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार

कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles