मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्षपदी रेखाताई ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरहीत राहणार नाही, माझ्या व्यक्तिगत कारणासाठी, पक्ष हा चालला पाहिजे, संघटन हे चालले पाहिजे, आंदोलनाला आपण सुरुवात केली आहे, पाच जिल्ह्यामध्ये निवडणूका आहेत म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं महत्त्वाचे आहे, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.