Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मधील भ्रष्टाचार विरुद्ध माकपाची निदर्शने

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मधील भ्रष्टाचार विरुद्ध माकपाची निदर्शने

दोषी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे जिल्हाभर गाजत असलेल्या 4 लाख 58 हजार 710 रुपये भ्रष्टाचाराविरुद्ध बुधवार रोजी नगरपंचायत समोर निदर्शने करण्यात आली.

श्याम शिंदे यांनी प्रशासकीय भ्रष्टाचाराची भाषणातून चिरफाड केली. नगरपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी कर निरीक्षक नम्रता देशपांडे, रोजंदारी कर्मचारी संतोष ठाकरे, यांना निलंबित करा. पाठबळ देणाऱ्या मुख्याधिकारी मीनाक्षी यादव यांचे निलंबन करून चौकशी करा. फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा. दोषी अधिकाऱ्याच्या पगारातून वसुली करा, आज केलेल्या आंदोलनातून वरिष्ठ अधिकारी यांनी दखल न घेतल्यास माकपा च्या वतीने सत्याग्रह आंदोलनाची हाक देण्यात आली.  

मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाही किंवा कुणावर येत्या कालखंडात लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर, भ्रष्टाचार विरुद्ध सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनात तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अ. मोहसीन, सुभाष लाड, दिलीप महले, रामदास मते, सुरेश गावनर,  अश्विनी कीनिकर, इंदिरा  चावळे, अनिल मारोटकर, मिलिंद चौरे, शहंनशाह, शोयब रजा, राजू राऊत, आकाश नेवारे, रमेश काळेकर, कैलास मरस्कोल्हे, पुंडलिक पुंड, कांतेश्वर पुंड, भास्कर कुंबरे, राजीक भाई, गजानन डकरे, ज्ञानेश्वर शिंदे, राजगुरू शिंदे, आशिष रावेकर, गणेश प्रधान, किशोर शिंदे, यांचेसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने निदर्शन करतेवेळी उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय