पुणे : परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्रातर्फे आणखी एक आंतरजातीय विवाह जुळून आला आहे व नोंदणी पद्धतीने तो नुकताच पुण्यात पार पडला. अमोल कदम व कविता धोत्रे यांनी पुण्यातील सरकारी विवाह नोंदणी कार्यालयात एक महिना आधी ऑनलाईन नोटीस देऊन मग हा आंतरजातीय विवाह केला आहे.
---Advertisement---
लवकरच सत्यशोधक पद्धतीने ही ते विवाह करणार आहेत. यावेळी परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राचे एक संचालक सचिन गोडांबे हेही साक्षीदार म्हणून उपस्थित होते. समाजातून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हाच सर्वांत मोठा व जालीम उपाय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
आंतरजातीय विवाह करणार्यांना डॉ. आंबेडकर फाउंडेशन कडून मिळणारे अडीच लाखांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठीही परिवर्तन विवाह केंद्र मदत व मार्गदर्शन करणार आहे.
---Advertisement---