एकेकाळी भारतात १९४० ते १९९० शहरापासून अगदी खेडेगावापर्यंतच्या माणसांच्या हाती रेडिओ दिसायचा. क्रिकेट स्पर्धा असो, बातम्या किंवा अन्य सर्व गाणी, भजने रेडिओ वर ऐकली जायची. त्या काळात कलर टिव्ही, मोबाईल ही आजची माध्यम क्रांती स्वप्नरंजन होते. All India Radio caller tune
रेडिओवरील (Radio Songs) भूपाळी अन् सकाळच्या बातम्यांनी घरा-घरात सूर्य उजाडायचा. अनेक घरात तर रेडिओवरच्या बातम्या सुरु होण्याआधी उठण्याचा दंडक असायचा. ‘आप की पसंत’ कार्यक्रमात आपल्या माणसासाठी गाणं ऐकवण्यासाठी हजारो पत्र यायची. अमीन सयानी यांचे गाण्याचे निवेदन लोकप्रिय होते. अमीन सयानी यांनी रेडिओला ग्लॅमर प्राप्त करुन दिलं. Remembering the Jewish refugee who composed the All India Radio caller tune :
रेडिओवरील धून किंवा रेडिओ थीम म्युझिकचा इतिहास भारतीय रेडिओसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रेडिओवरील धूनची सुरुवात 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ (AIR) च्या स्थापनेपासून झाली.
ऑल इंडिया रेडिओच्या प्रसारणाच्या सुरुवातीसाठी विशिष्ट संगीताची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा समावेश होता. ही धून श्रोत्यांना रेडिओ सुरू झाल्याचे सूचित करण्यासाठी आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्यासाठी तयार केली गेली होती.
प्रसिद्ध संगीतकार व जन्माने ज्यू असलेल्या वाल्टर कॉफमन यांनी 1936 मध्ये आकाशवाणी साठी एक सिग्नेचर ट्यून तयार केली होती. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर करून एक आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी धून तयार केली. सकाळी रेडिओ सुरू होताना ही धून संपूर्ण मनाला आनंद देत असे.
1934 साली जेव्हा हिटलरने प्राग देशावर आक्रमण केलं तेव्हा वॉल्टर हा 27 वर्षांचा तरुण हिटलरच्या तावडीतून वाचण्यासाठी भारतात मुंबईत आला. त्याला संगीताची आवड होती. 1936 ते 1946 पर्यंत, वॉल्टर यांनी आकाशवाणीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले, आणि येथेच त्यांनी प्रसिद्ध भारतीय ऑर्केस्ट्रा मेकर मेहली मेहता यांच्यासमवेत आयकॉनिक सिग्नेचर ट्यून तयार केले, ज्यांनी त्यासाठी व्हायोलिन आणि तंबोरा ई साधने वापरून ही धून तयार केली.
पण कोणतेही रेडिओ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ही सुमधुर, शास्त्रीय संगीताने नटलेली धून आजही आठवणीत राहते. या सुरुवातीच्या धूनची आठवण आजही लोकांच्या मनात ताजी आहे आणि भारतीय संगीताचा अविभाज्य भाग आहे. संकलन – क्रांतीकुमार कडुलकर