जेजुरीत जागतिक महिला दिनी शिक्षिकांचे हाती सत्कारात ज्ञानेश्वरी (Alandi)
आळंदीतील ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास हरिनाम गजरात प्रारंभ
आळंदी (अर्जुन मेदनकर) – ज्ञानेश्वरी ही जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ७३४ वर्षांपूर्वी सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान, संत साहित्य हे आपल्या जीवनाला आकार देण्यास आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पाषष्टी आदी संत साहित्य हे साहित्य आपण वाचले तर नक्कीच आपल्या जीवनात बदल होईल. माऊलींचे साहित्य फक्त वाचन करण्यासाठी नाहीतर ते आत्मसात करण्यासाठी असून ते जगाला वाचविण्यासाठी असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी सांगितले. (Alandi)
जनता शिक्षण संस्थेच्या अहिल्यादेवी होळकर विद्या मंदिरात महिला दिना निमित्त ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलासाठी असलेला मूल्य संस्कारक्षम उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून उत्साहात सुरु करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य युवराज घोळवे होते. या प्रसंगी व्यासपीठावर ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे विश्वभर पाटील, अर्जुन मेदनकर, दीपक काळे, जिजामाता हायस्कूलचे शिक्षक प्रतिनिधी साहेब पिसाळ, छाया पोटे, माध्यमिक शिक्षक प्रतिनिधी श्रवणकुमार बेलदार, ज्युनिअर कॉलेज शिक्षक प्रतिनिधी महेश तांबे, अमोल जगताप, दीपक गिरमे, जितेंद्र कोकणी, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. (Alandi)
ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रम अंतर्गत मूल्य शिक्षण, संस्कारक्षम शिक्षण, महिला दिनाचे उपक्रमास अस्थी कलश स्थळ स्मारक पूजनाने झाली. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते व सर्व महिला भगिनींच्या हस्ते गुरुवर्य दादा व माई यांच्या प्रतिमेचे, माता सरस्वती पूजन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपक्रमाती संत साहित्य सार्थ श्री ज्ञानेश्वरी, ओळख श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ, सार्थ हरिपाठ आदी संत साहित्य प्रशालेस सुपूर्द करण्यात आले. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सानि वर्षा निमित्त श्रींची प्रतिमा शाळेस भेट देत श्रींची पालखी जेजुरीतून वारीसाठी पंढरपूरला जात असताना शालेय मुलांनी हरिपाठाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचे आवाहन प्रकाश काळे यांनी केले.
शिक्षक मनोगतात ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख धनाजी वाबळे, छाया पोटे , कांचन दीक्षित, यांनी व्यक्त करीत महिला दिनाचे उपक्रमात मार्गदर्शन करीत संस्कारक्षम उपक्रमातून महिला दिनी शिक्षिकांचे हाती ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आदी संत साहित्य भेट देत या उपक्रमास गती देण्यासाठी दिलेले साहित्य भेट निश्चित उपयुक्त ठरणार असल्याचे महिला शिक्षिकांनी सांगत महिला दिन रोजच साजरा व्हावा. तो एका दिवसा पर्यंत मर्यादित राहू नये असे आवाहन केले. यावेळी प्राचार्य युवराज घोळवे यांनी या उपक्रमाची शालेय मुलांना आवश्यकता असल्याने मुले सुशिक्षित, संस्कारक्षम, सुसंस्कृत होण्यासाठी हा उपक्रम या प्रशालेत निश्चित प्रभावी राबविला जाईल अशी ग्वाही देत आपले मनोगतात उपक्रमाचे स्वागत केले.
ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाची महती, अध्यात्माचे जीवनातील स्थान, महिला दिना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आईचा अन्नाचा डबा आणि माऊलींचे संत साहित्याचा शब्द रुपी हरिपाठ, ज्ञानेश्वरी साहित्याचा डबा श्रवण, चिंतन, मनन करीत सेवन करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक पर्यवेक्षक तात्यासाहेब बारवकर यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले. आभार दशरथ वालकोळी यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख गिरमे, श्रीमती शीतल गायकवाड, श्रीमती नूतन जगताप यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.