Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : वुई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जागतिक महिला दिनानिमित्त वुई टूगेदर फाउंडेशन आयोजित आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा महिलांचा ओटी भरण व सत्कार समारंभ काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे आयोजित केला होता. सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे. सदर योगदानाच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा केला जातो, तसेच यानिमित्त महिलांच्या सबलीकरणासाठी सुद्धा आव्हान केले जाते. (PCMC)

समाजात अशा बऱ्याच महिला आहेत ज्या एकल आहेत म्हणजे विधवा आहेत बऱ्याच ठिकाणी काही समाज अंधश्रद्धेपोटी त्यांना शुभ कार्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल आहेत परंतु त्यांनी हिम्मत न हरता पडेल ती काम करून आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला आहे व करत आहेत, अशा बऱ्याच महिला आहेत, ज्यांना पती जिवंत असताना बाहेर जायची गरज नव्हती परंतु पती निधनामुळे त्यांना आर्थिक समतोल साधण्यासाठी बाहेर पडावे लागले.

---Advertisement---


प्रसंगी स्वतःच्या शिक्षणाचा स्तर वाढवावा लागला तसेच काही बायकांना टेक्निकल शिक्षण सुद्धा घ्यावे लागले. परंतु परिस्थिती पुढे हार न मानता त्या झगडत राहिल्या व आपल्यासोबत आपल्या सासू-सासरे व मुलांचा सांभाळ करत आहेत व जगाला प्रेरणा देत राहिल्या अशा सर्व आर्थिक दृष्ट्या दुर्बल जवळपास 100 हून अधिक विधवा महिलांचा साडी चोळी,नारळ, ओटी भरून पुष्पगुछ व विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


सदर कार्यक्रमाला डॉक्टर गीतांजली क्षीरसागर,अनेक पुरस्कार प्राप्त, मॉडेलिंग मध्ये अग्रगण्य, कायम समाजहीत कार्य प्राणीमित्र, सदस्य,केंद्रीय फिल्म सल्लागर समिती, डॉ. स्मिता बारवकर, महावितरण अभियंता शीतल मेश्राम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

तसेच नारदीय कीर्तनकार अमृता देशपांडे यांचे महिला प्रबोधन पर्व व्याख्यान झाले.
वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी प्रास्ताविक केले व सर्व महिला भगिनींचे स्वागत करून अभिनंदन केले.

सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महिलांना मार्गदर्शन केले.

सलीम सय्यद यांनी उपस्थितांना फाउंडेशनची थोडक्यात माहिती दिली. अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी वरील कार्यक्रमाची संकल्पना मांडली व त्यास सर्व पदाधिकारी सदस्य यांनी एकमुखी होकार देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. (PCMC)

अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी,सह सचिव मंगला डोळे -सपकाळे उपाध्यक्षा सोनाली मन्हास, खजिनदार दिलीप चक्रे, माजी अध्यक्ष सलीम सय्यद, अनिल शिंदे, शंकरराव कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, अवधूत कुलकर्णी, रंगाराव, दिलीप पेटकर, दारासिंग मन्हास, रवींद्र काळे, रवींद्र सागडे, विलास गटणे, अर्जुन पाटोळे, सोनाली शिंदे, सोनाली डावरे, भास्कर पाखले, अनिल शिंदे, अरविंद पाटील, धनराज गवळी, खुशाल दुसाने, सौ. गवळी ताई, रेखा दुसाने, अपर्णा कुलकर्णी, वासंती काळे, शीला चक्रे, सरिता कुलकर्णी, सौ रंगा राव, सौ पेटकर,आदिनी..!हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा घेतला.

आदर्श शिक्षिका फाउंडेशन सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी उकृष्ठ सूत्रसंचालन केले,
सह सचिव जयंत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तर उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.

उपस्थित सर्व महिलांना या उपक्रमाचा खूप अभिमान वाटला. काहींच्या डोळ्यात अश्रू गहिवरले होते.बऱ्याच महिला खूप भावनिक झाल्या होत्या. अनेक महिलांनी तसे मनोगतात व्यक्त केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles