आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदी केंद्रात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, भव्य मंडप, आकर्षक रांगोळी काढून केंद्राचा आतील व बाहेरील परिसर अधिकच सुशोभित करण्यात आला होता.
सकाळ पासूनच विविध पूजा विधी, होम –हवन असे आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाला. संपूर्ण केंद्राचा परिसर अध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाने दुमदुमून गेला होता. alandi news
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळ पासूनच भाविकांची अलोट गर्दी केंद्रात झाली होती. या निमित्त सामुदायिक गुरुचरित्र वाचन, सत्यदत्त पूजन महिला सेवेकरी उज्वला मुंगसे यांनी पार पाडले.
श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा, अभिषेक सिंधुताई कुटे यांच्या हस्ते झाली. नित्य स्वाहाकार, बलिपूर्णाहुती ही सेवा मनीषा थोरात यांच्या हस्ते पार पाडली. कुलदेवी – देवता मान –सन्मान सोहळा पार पडला. गुरुचरित्र वाचन वाचकांनी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. महानैवेद्य, महाआरती झाली उत्साहात झाली. स्वामी चरित्र कार्य स्वामी सेवा दिंडोरी प्रणित सेवा मार्ग याविषयी उपस्थित त्यांना मार्गदर्शन राणीताई घुंडरे यांनी केले. Alandi news
भाविकास महाप्रसाद दुपारी २ वाजता झाला. दिवसभर सेवेकरी भाविकांनी वैयक्तिक व सामूहिक व इतर सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. स्वामी दरबारामध्ये दिवसभर स्वामी दर्शनासाठी सेवेकरी, भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
सात दिवस अखंडपणे चालणाऱ्या आध्यात्मिक सप्ताहास पंचक्रोशीतील, स्थानिक परिसरातील मुले ,महिला ,पुरुष अशा सर्वच वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखंड नाम जपयज्ञ सप्ताहात आळंदी केंद्राचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या विभागाचे महिला व पुरुष विभाग प्रतिनिधी, निरीक्षक, सेवेकरी वर्ग या सर्वांनी एकत्रितपणे सप्ताहाचे आध्यात्मिक, सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडले. वरील सर्व मान्यवरांची उपस्थिती व भूमिका, कार्य श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. Alandi news
आळंदी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सामुदायिक गुरुचरित्र वाचन सप्ताहात वाचकांची एकूण संख्या ही २६५ राहिली. एवढ्या प्रचंड अशा संख्येने स्वामीभक्त गुरुचरित्र वाचन ( पारायणास) बसले होते. दिवसभर स्वामी केंद्रात स्वामी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी झाली होती. || अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय || श्री स्वामी समर्थ नाम जय घोष मध्ये परिसर दुमदुमला.