आळंदी / क्रांतीकुमार कडुलकर : चऱ्होली येथील काळे काँलनीमध्ये सचिन काळे युवा मंचच्या वतीने आळंदी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंते विष्णूकुमार शिवशरण यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विद्युत खांभ (street light) उभारण्याची मागणी केली आहे. (Alandi)
काळे कॉलनी गेल्या 10 वर्षापासून काही भागात विद्युत खांब नसल्याने नागरिकांमध्ये रात्रीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्री रस्त्यावर लाईट नसल्यामुळे महिलांना रस्त्यावर ये जा करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी संध्याकाळी शिकवणीसाठी घराबाहेर ये- जा करत असतात काही टवाळखोर मुले त्या ठिकाणी विद्यार्थिनीची छेडछाड करतांना नागरिकांना पाहायला मिळाले.
यावेळी नगरसेवक अँड. सचिन काळे म्हणाले की, मी वारंवार नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियांत्यांना तोंडी वारंवार कल्पना दिली आहे. पण ते गांभीर्याने घेत नाहीत.
महिला व विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार रस्त्यावर झाल्यावरच नगरपरिषदेला जाग येईल का ? असा उद्दीग्न प्रश्न काळे यांनी विचारला आहे. काही चुकीचे घडल्यास आम्ही विद्युत विभागाच्या विरोधात जनआंदोलन उभा करून जाब संबंधित अधिकार्याला विचारू असे ते म्हणाले.(Alandi)
यावेळी नगरसेवक अँड. सचिन काळे, युवा नेते मंगेश काळे उपस्थित होते.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत केला विक्रम
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती