Alandi (अर्जुन मेदनकर) : श्रीगुरु हैबतरावबाबा पायी दिंडी ने श्रीक्षेत्र आळंदी ते पिंपळनेर पायी वारी दिंडी सेवाप्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात वारी केली. आळंदी येथील मंदिरातून यासाठी दिंडीचे हरिनाम गजरात प्रस्थान झाले होते. या प्रसंगी श्रीगुरु हैबतराव बाबा ओवारीतून दिंडीने पूजा, मंदिर व आळंदी येथील ग्रामप्रदक्षिणा मार्गावरून हरिनाम गजर करीत प्रस्थान ठेवले होते.
श्रीगुरु हैबतबाबा दिंडीची परंपरा कायम (Alandi)
या प्रसंगी स्वामी सुभाष महाराज यांचे हस्ते वीणा पूजन झाले. श्रीगुरु हैबतरावबाबा समाधी दर्शन आशीर्वाद घेऊन जनार्दन महाराज विणेकरी यांचेकडे श्रींचे दिंडीतील मानाचा वीणा स्वामी सुभाष महाराज यांनी पायीवारी साठी दिंडीकडे सुपूर्द केला. श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांची वारी करून श्रीगुरु हैबतराव बाबा पायी दिंडीने परतीचे मार्गे आळंदी कडे हरिनाम गजरात प्रस्थान ठेवले. (Alandi)
परंपरेने आळंदी देवस्थान व श्रीगुरु हैबतरावबाबा पायी दिंडी तर्फे श्री संत निळोबारायांचे समाधीची महापूजा झाली. दिंडीने वारकरी यांचे समवेत वीणा मंडपात पंचपदी झाली. श्री संत निळोबारायांचे मानकरी सुनील गाजरे पाटील, अनिल गाजरे पाटील यांचे येथे दिंडीचे स्वागत, पाहुणचार उत्साहात झाला. दिंडीचे प्रस्थान पूर्वी गाभाऱ्यात निळोबारायांची पूजा, आरती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, देवस्थांन मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, दिंडी क्रमांक १चे मालक माऊली गुळुंजकर, ज्येष्ठ वारकरी, पायी दिंडीतील वारकरी आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त स्वामी सुभाष महाराज यांचे हस्ते झाली.
पिंपळनेर येथे श्री संत निळोबाराय यांची वरी २७२ वा समाधी सोहळा प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, मालक बाळासाहेब आरफळकर, माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक माऊली वीर आदींचे उपस्थितीत आळंदी मंदिरातील तसेच दिंडी पायी वारी आणि संत निळोबाराय सोहळा यातील परंपरांचे पालन करीत श्री गुरु हैबतबाबा दिंडीने सेवा रुजू केली. आळंदी देवस्थानने परंपरेने व्यवस्था आदी सेवा देत परंपरा कायम ठेवली.

हे ही वाचा :
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत
मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी
माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल