Wednesday, December 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत वारकरी सांप्रदायिक कीर्तन हरिपाठाचे आयोजन

Alandi : आळंदीत वारकरी सांप्रदायिक कीर्तन हरिपाठाचे आयोजन

आळंदी : (अर्जुन मेदनकर) : वारकरी संप्रदायातील प.पु. गुरुवर्य वैकुंठवासी वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल महाराज चौधरी यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिना निमित्त आळंदीत वारकरी सांप्रदायिक कीर्तन व हरिपाठ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हरी भक्त परायण नरहरी महाराज चौधरी यांनी दिली. (Alandi)

शांती ब्रह्म हरिभक्त परायण प. पु. श्री मारुती महाराज कुरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय कीर्तन व हरिपाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, गुरुजन, आळंदी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आजी-माजी साधक, गुरुबंधू यांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमातील कीर्तन हरिपाठ श्रवणाचे पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन नरहरी महाराज चौधरी यांनी केले आहे.

वैभव महाराज राक्षे यांची प्रथम दिनी बुधवारी ( दि. १७ ) कीर्तन सेवा झाली. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज चौधरी वारकरी सेवा पुरस्कार रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांना बुधवारी ( दि. १८ ) शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे.

गुरुवारी ( दि. १९ ) स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुरस्कार हरिभक्त परायण आबासाहेब महाराज गोडसे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात रमेश महाराज अडविहीरकर, केशव महाराज शिवणे तसेच शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने वारकरी सांप्रदायिक कीर्तन सोहळ्याची सांगता होणार आहे. (Alandi)

या निमित्ताने आळंदी मध्ये ज्ञानदान, अन्नदान उपक्रम होत आहे. साधक, वारकरी, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय