ALANDI / अर्जुन मेदनकर : येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेने पवमान अभिषेख, नित्यउपचार पूजाविधा, महानैवेद्य, धुपारती आदी कार्यक्रमानी मोहिनी एकादशी आळंदीत साजरी करण्यात आली.
मोहिनी एकादशीच्या उपवासामुळे संपूर्ण जीवनात एकादशी केल्याचे फळ प्राप्त होते, अशी भावना वारकरी संप्रदायात असल्याने या एकादशीला खूप महत्त्व आहे.आळंदी मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. आळंदी (alandi) देवस्थानने भाविकांना पिण्याचे पाणी वाटपाचे दर्शन बारीक थेट नियोजन केल्याने भाविकांची सोय झाली.
मोहिनी एकादशी पर्वकाळ रविवारी ( दि १९ ) एकादशी केल्यास आयुष्यभर एकादशी केलेचे पुण्य अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मोहिनी एकादशी आळंदी, देहु पंचक्रोशीत धार्मिक महत्त्व ओळखून साजरी झाली. या एकादशीला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे. Alandi
या निमित्त विश्वस्त योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माऊली वीर , सेवक कर्मचारी यांनी नियोजन केले. आळंदीत एकादशी दिनी अन्नदान फराळाचे वाटप उत्साहात करण्यात आले. Alandi
यावेळी दिव्यांग बांधवानी आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाची हरिनाम गजरात सांगता झाली. यावेळी समाजरत्न नानजी ठक्कर यांनी मार्गदर्शन करीत संवाद साधला. गेल्या दोन वर्षा पासून हे पारायण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी देवस्थानच्या सहकार्याने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. Alandi news


हेही वाचा :
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर
मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला
शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे