आकुर्डी (पुणे) : मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली, त्यांच्या फासीवादी विरोधी, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी ‘जन आंदोलनाची संघर्ष समिती’च्या वतीने आज पिंपरी चिंचवड तहसीलदार कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली, व त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मानव कांबळे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते, नागरी हक्क सुरक्षा समितीचे युवक अध्यक्ष प्रदीप पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा संघटक नीरज कुमार कडू, प्रहारचे संदीप जाधव, स्वराज अभियानचे दिलीप काकडे, अशोक मोहिते, विजय माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.