Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

AJIT GAVHANE : चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार- अजित गव्हाणे

चऱ्होली एक झाली; परिवर्तनाची घोषणा दुमदुमली (AJIT GAVHANE)

‘तुतारी वाजवा, ७/१२ वाचवा’ म्हणत चऱ्होलीकरांचा थेट मुद्द्यालाच हात



पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर :चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या आहेत. गावठाणाबरोबरच वाढत असलेल्या सोसायट्यांमुळे या भागामध्ये पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे त्यामुळे प्राधान्याने चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. (AJIT GAVHANE)

दरम्यान अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ चऱ्होली येथून झाल्यानंतर काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांनी ठिकठिकाणी नागरिकांकडून मिळणारे स्वागत स्वीकारत गावाचा पाणी प्रश्न तातडीने निकालात काढण्यात येईल असे आश्वासन दिले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार रॅलीला चऱ्होली भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हजारो नागरिक या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यामध्ये महिला भगिनींचा सहभाग मोठा होता.

---Advertisement---

यावेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे, कुणाल तापकीर, सागर तापकीर, सुनील पठारे, हरिभाऊ तापकीर, सचिन तात्या तापकीर, अनुज तापकीर,संदीप तापकीर, प्रशांत तापकीर, गणेश ताजने, सोमनाथ तापकीर, चेतन तापकीर, शुभम तापकीर राजुशेठ वाखारे, संतोष तापकीर, विक्रम गिलबिले, श्रेयस चिखले आदी उपस्थित होते.

प्रचार रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अजित गव्हाणे यांचे महिला भगिनींकडून औक्षण करण्यात आले. आगामी काळात महिला भगिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन यावेळी अजित गव्हाणे यांनी दिले.

या परिसरात हजारो नागरिक वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन, व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे. पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. त्यासाठी सक्षम उपायोजना केल्या जातील असा विश्वास अजित गव्हाणे यांनी दिला.

तुतारी वाजवा ७/१२ वाचवा

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारात वापरल्या जाणाऱ्या घोषणा परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. भोसरी गावठाणा मध्ये एकी हेच बळ, आम्हाला खेळ संपवता येतो या घोषणा चांगल्याच रंगल्या होत्या. तर चऱ्होली येथे तुतारी वाजवा ७/१२ वाचवा ही घोषणा लक्षवेधी ठरली.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मैदानात

प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरलेले दिसून आले. महाविकास आघाडीची एकजूट अजित गव्हाणे यांना विधिमंडळापर्यंत पोहोचवणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान शिवसेना ,काँग्रेस तसेच इतर घटक पक्षातील कार्यकर्ते नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या क्रमांकाचे तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

---Advertisement---
whatsapp link
google news gif


हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles