Sunday, March 30, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association, MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे जावाई आणि MCA चे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांना माजी अध्यक्ष शरद पवार गटाचा पाठिंबा होता. त्यांनी संजय नाईक यांचा 107 मतांनी पराभव केला आहे.

---Advertisement---

माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना 221 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संजय नाईक यांना 114 मतं मिळाली. एकूण 335 जणांनी मतदान केलं होतं. (MCA Election)

संजय नाईक यांना भाजपा नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यंदा MCA अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार अशी चर्चा होती, परंतु पटोले यांनी काँग्रेस नेते भूषण पाटील यांना पाठिंबा देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. भूषण पाटील यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीत अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे दोनच उमेदवार होते.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles