Thursday, February 13, 2025

या मागण्या मान्य…शेतकरी मोर्चा अखेर माघारी

पाच दिवसांच्या farmers Agitation आंदोलनानंतर शेतकरी लॉन्ग मार्च माघारी फिरणार आहे.माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आंदोलनाला यश आले असून, सरकारने मागण्या मान्य केल्याने मोर्चा माघारी फिरणार आहे. रेल्वेगाडीतून सर्व शेतकरी घरी परतणार आहेत, अशी माहिती गावित यांनी माध्यमांशी संवाध साधताना शनिवारी दिली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून, आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत. जिल्हाधिकार्‍यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली, असे सांगत गावित यांनी पोलिस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.


आंदोलन स्थगित होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनावर ठाम राहू, असा निर्धार farmers Agitation आंदोलक शेतकर्‍यांनी केला होता. मात्र, बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकार्‍यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. आम्ही 17 मागण्या केल्या होत्या, यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान सरकारतर्फे शेतकर्‍यांना घरी पोहोचवण्यासाठी रेल्वेगाडी बुक करण्यात आली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles