Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : जेवणानंतर आता दुधात अळ्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू

घोडेगाव : आदिवासी आश्रमशाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोडेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या गोवर्धन कंपनीच्या दुधात अळ्या आढळून आलेल्या आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Ghodegaon)

---Advertisement---

नुकतीच मागील 15 दिवसांपूर्वी घोडेगाव येथील सेंट्रल किचन मधून पुरवल्या गेलेल्या जेवणात अळ्या आढळून आलेल्या होत्या, हि घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आश्रमशाळेत ठेकेदारांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या गोवर्धन कंपनीच्या दुधाच्या ट्रेट्रापॅक मध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत. (Ghodegaon)

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर या प्रकरणावर म्हटले आहे की, आदिवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दूध १३२ रु. लिटर एवढ्या महाग दराने खरेदी करून सुद्धा त्यामध्ये अळ्या निघत असतील तसेच ८० कोटींची दलाली खाऊन ही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दूध पुरविण्याची यांची दानत नसेल तर यांच्या स्वार्थाला अंत नाही असेच म्हणावे लागेल. असो गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या दुधावर डल्ला मारणाऱ्यांचे स्वप्न नासवल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही हे मात्र नक्की आहे. 

---Advertisement---

Ghodegaon

दरम्यान, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व बिरसा ब्रिगेड या संघटनांनी पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यावेळी एसएफआयचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक वालकोळी, सहसचिव समीर गारे, रोहिदास फलके, योगेश हिले तसेच बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी, आंबेगावचे बुधाजी डामसे, उमाताई मते उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles