Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकेळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या !

केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या !

महाराष्ट्र आरोग्यनामा : केळी हे फळ सर्व ऋतूमध्ये मिळते. केळीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. केळीमुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. केळीमुळे मोठ्या प्रमाणात शरीराला ऊर्जा मिळते. केळीमुळे पचनक्रिया सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास केळी उपयुक्त ठरते. प्रवासादरम्यान केळी खाल्यास कफचा त्रास दूर होतो. केळीमध्ये ११० कॅलरीज असतात.

पोषक घटकांचा खजिना 

केळीमध्ये पोटॅशियम, मँगनीज, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर्स, स्टार्च व सेल्युलोज अशी कर्बोदके, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, अल्फा कॅरॉटिन व बीटा कॅरॉटिन ही कॅरॉटिनाइड फायटोकेमिकल्स यासारखी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकघटक मोठ्या प्रमाणात असतात. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात व थकवा दूर होतो. 

पोटॅशियम भरपूर असते. एका केळ्यामध्ये ४०० मिलीग्रम पोटॅशियम असते. शरीरासाठी जसे कॅल्शियम महत्त्वाचे असते, तसेच पोटॅशियमही गरजेचे असते. मांसपेशी आणि नाड्यांच्या (Nerves) कार्यासाठी पोटॅशियमची नितांत गरज असते. पोटॅशियममुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरच्या त्रासामध्येही केळी उपयोगी ठरते. याशिवाय पायात गोळा येणे हा त्रास पोटॅशियममुळे होत नाही. 

फॅट आणि कोलेस्टेरॉल फ्री …

केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या फॅट आणि कोलेस्टेरॉल नसतात. फॅटमुळे चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे यासारख्या समस्या होतात. केळी खाल्याने कोलेस्टेरॉलही कमी होण्यास मदत होते. 

मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त  

मेंदूच्या विकासासाठीही पोटॅशियमची गरज असते, म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पौष्टिक, सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळे खाण्यास द्यावे. केळे खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये, यासाठी मुलांना केळे हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.

वजन वाढण्यास उपयुक्त

एका केळ्यामध्ये साधारणपणे १०० ते १२० कॅलरीज असतात. तसेच अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. वजन वाढत नसेल तर आहारात केळीचा समावेश करावा. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. 

कॅल्शियम आणि लोह 

केळ्यामध्ये कॅल्शिअम , लोहही मुबलक असते. त्यांमुळे हाडांच्या आरोग्यासाठी किंवा हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टीओपोरॉसीस) हा आजार टाळण्यासाठी रोज एक केळी खावे. तसेच केळीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते.

मँगनीज 

केळीमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या मँगनीज ह्या पोषकतत्वाचे प्रमाणही मुबलक असते. एका केळ्यात ०.३ मिलीग्रम मँगनीज असते. एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला १.८ ते २.३ मिलीग्रम मँगनीजची गरज असते. हाडांच्या आरोग्यासाठी आणि चयापचय क्रियेसाठी मँगनीजची गरज असते. 

फायबर्स 

एका केळीमध्ये ३ ग्रॅम तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. त्यामुळे नियमित पोट साफ होण्यासाठी यामुळे मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता त्रास असल्यास केळी खाल्याने आतड्यांच्या स्नायूंची हालचाल व्यवस्थित होऊन आतड्यात साचलेला मल पुढे ढकलण्यास मदत होते.

व्हिटॅमिन B6 

प्रत्येक व्यक्तीला साधारण २ मिलीग्रॅम इतकी B6 या जीवनसत्त्वाची गरज असते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात B6 जीवनसत्त्व असते. एका केळ्यामध्ये दिवसाच्या गरजेपैकी तब्बल ३५ % व्हिटॅमिन B6 असते. या जीवनसत्वामुळे शरीरात नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते. B6 जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घटते, शरीराची वाढ खुंटते, हात – पायही भरपूर दुखतात. लहान मुलांमध्ये B6 जीवनसत्त्वांचं प्रमाण घटल्यास त्यांना सारख्या फिट्स येतात.

केळीत असणाऱ्या ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो . यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप फायदेमंद आहे. दररोज केळी खाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते. दारू पिल्याने चढलेली नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेक लाभदायक असतो.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

संबंधित लेख

लोकप्रिय