Tuesday, March 11, 2025

ब्रेकिंग : पुण्यात करोनाच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनचे ७ रुग्ण आढळले

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी चिंचवड : युरोप आणि उर्वरित जगाची झोप उडवणारा ओमायक्रॉन विष्णुने शहरात प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात ६ जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय. तर पुण्यातही ओमायक्रॉनचा १ रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ८ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ६ रुग्णांपैकी ३ जण हे नायजेरियाहून आले आहेत. तर इतर तिघे त्यांचे निकटवर्तीय आहेत. तर पुण्यात ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण हा १८ ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान फिनलँडला गेला होता.

दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे.  ते सहा जण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

“पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. ४४ वर्षीय महिला ही नायजेरियातून दोन्ही मुलींसह पिंपरीत तिच्या भावाकडे आली होती. तेव्हा, तिच्यासह भाऊ आणि त्यांच्या दोन मुली अशा एकूण सहा जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. या सहा जणांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील ४४ वर्षीय महिलेला ताप आलेला होता, इतर मुलांना आणि महिलेचा भावाला जास्त लक्षण नाहीत ते सर्व सुखरूप आहेत.” अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles