---Advertisement---
---Advertisement---
पुणे : गुलाबी थंडी आणि दाट धुके… असे मनमोहक वातावरण सध्या पुणे शहर परिसरात आहे. सलग तीन दिवस पाऊस पडत होता. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवेत गारवा वाढू लागला. थंडीपासून बचाव करणाऱ्या शेकोट्या पावसामुळे थंड झाल्या. संपूर्ण शहरात शुभ्र धुके पसरू लागले. दाट धुके आणि दवबिंदू मुळे पहाटेला शोभा येऊ लागली.
धनकवडी येथील सर्वत्र धुके पसरलेल्या विहंगम, नयनरम्य दृश्याचे येथील नागरिक नरसिंह पराडकर यांनी टिपलेली (सोमवार ६ डिसेंबर) काही मनमोहक क्षणचित्रे पुण्याचे धुक्यातील सौंदर्य दाखवत आहेत.
– क्रांतिकुमार कडुलकर