मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली होती. हि योजना कमी कालावधीत राज्यात प्रसिद्ध झाली. या योजनेचे आता पर्यंत हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. असताना आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
अक्षय्य तृतीयेला मिळणार हप्ता | Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एप्रिल 2025 चा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा केले जाते. (हेही वाचा – मोठी बातमी : सोन्याचा दर 1 लाखांवर ; वाचा पुणे, मुंबई मधील सोन्याचे दर)
यावर्षी अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन हप्ता वितरणाची तारीख निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 रोजी सुरू झाली असून, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हा आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. (हेही वाचा – निवडणूकीतील घोटाळा ते वाल्मीक कराडच्या एनकाऊंटर पर्यंतचे आरोप करणारे निलंबित पोलीस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात)
योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ दिला जातो. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि महिलेकडे आधार-लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
एप्रिल हप्त्याबाबत महत्वाची माहिती
मंत्री आदिती तटकरे यांनी 21 एप्रिल 2025 रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल. यामुळे महिलांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, योजनेचे निकष जैसे थे ठेवण्यात आले असून, कोणतेही नवीन बदल लागू करण्यात आलेले नाहीत.
यावेळी त्यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 19 लाख 20 हजार महिला लाभार्थ्यांना 1 हजार मिळतात. त्यामुळे शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत अशी सोय असल्याने लाडकी बहीण योजनेमधून केवळ 500 रूपये दिले जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे. (हेही वाचा – ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन : भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर)
अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी.
वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
आधार-लिंक बँक खाते आणि डीबीटी सुविधा सक्रिय असावी.
कुटुंबातील सदस्य आयकरदाता किंवा सरकारी कर्मचारी नसावेत.
अर्ज करण्यासाठी महिलांना ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा नारीशक्ती दूत ॲपद्वारे अर्ज सादर करता येतो. (हेही वाचा – आता ‘एआय’ बनवेल कायदे, संयुक्त अरब अमिरातीची घोषणा)