पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.08-पिंपरी कॅम्प येथील रिअल लाईफ रिअल पीपल संचालित सावली निवारा केंद्रातील बेघर,निराश,विकलांग, विमनस्क,बेवारस लोकांसाठी कार्य करणाऱ्या पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्रात अन्नदान करून अन्नधान्य देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संस्थापक एम ए हुसेन यांनी स्फूर्ती गीते,हिंदी मराठी भावगीते सादर केली.
मातोश्री रमाई महिला विकास ट्रस्ट व मातोश्री महिला मंडळ,संत तुकारामनगर येथील संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकूण 18 महिला सह 65 बेघर लोकांना अन्नदान व धान्यदान केले.मंडळाच्या सचिव ज्योती गायकवाड यांनी सांगितले की,इथे कुटुंबाने बेवारस सोडलेल्या,विमनस्क महिलांचे व पुरुषांचे संगोपन केले जाते.खऱ्या अर्थाने ‘दिन’ असलेल्या या वंचिताना मदत करून महिला दिन साजरा करत आहोत.
अध्यक्ष सुलोचना कांबळे,उपाध्यक्षा वैशाली झेंडे,सचिव ज्योती गायकवाड,विजया नितनवरे, सुभद्रा अडसुळे शकुंतला कदम,सुजाता पवार,कलावती जाधव,प्रणिता कांबळे,सुगंधाशिर्के,कांचन दोडके या महिलांनी अन्नदान करून स्फूर्ती गीतांना उत्स्फूर्त साद दिली.यावेळी संदीप चव्हाण, गणेश कानूरकर, किशोर पवार, शुभम चौधरी सह सावली निवारा केंद्राचे गौतम थोरात, सचिन बोधनकर, अमोल भाट, मिलिंद माळी, अग्निश फ्रान्सिस, सुनीता श्रीनाथ, लक्ष्मी वायकर, उमा भंडारी स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG-20230308-WA0050.jpg)